Abhay Shivgounda Patil

About what matters.

Archive for April 2011

आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी…

with 2 comments

A poem by Shankar Vaidya I read some 30 years ago, comes back whenever I hear passing away of an elderly person.
 
आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी माझा निरोप घेउन निघताना
पदोपदी गहिवरून येण्याचं वय आता जवळ आलयं वाटतं
 
तुमच्या निघण्यापुर्वीच्या सामानाच्या मांडामांडीतच दिसू लागलेत आवराआवरीचे हात
ते तुमचं लगबग चालणं, मागे-पुढे होणं, मधूनच घड्याळात पाहणं,
आणि तरीही अजून खूप वेळ आहे असं स्वतःशीच म्हणणं
असं चालतं राहतं तुमचं – तुमचं तुमच्या नकळत वागणं
पण आवाज न होताही जाणवतात भरतीच्या लाटांचे हेलकावे – त्यांचं अवजड वजन…
 
खरं म्हणजे तुम्ही मला आता फसवायला हवं
असं दाखवायला हवं की सहजच निघालो आहोत बाहेर
या इथे कोपर्‍यावर
साबण आणण्य़ासाठी वा काड्यांची पेटी
आणि असे हे लागलीच परत येणार आहोत – बस् दोन मिनीटात
 
पण तरीही फसवतांना तुम्ही कोणत्यातरी वेगळ्या गोष्टीचा उल्लेख करा
म्हणा चॉकलेट लिमलेट किंवा असंच काहीतरी
पण काड्यांची पेटी मात्र नकॊ
आता काड्यांची पेटी म्हटलं तरी सुद्धा कसतरीच होउ लागतं बघा
आता तुम्हीच काळजी घ्यायला हवी माझा निरोप घेउन निघताना…
 
– कवी श्री. शंकर वैद्य
(आठवेल तसे लिहील्याने चूक भूल देणे घेणे.)
Advertisements

Written by Abhay Shivgounda Patil

April 3, 2011 at 2:58 pm

Posted in Marathi, Poetry