Abhay Shivgounda Patil

About what matters.

दोन स्थलांतरांची गोष्ट – भाग १

leave a comment »

swadesh-1दोन हजार सात साली ग्रंथालीच्या “स्वदेश” या पुस्तकासाठी लिहिलेला हा लेख ब्लॉग माध्यमातून पुन: प्रकाशित करत आहे. याच्या English version साठी इथे टिचकी मारा!

तुम्ही भारतात परत का आलात?”

पहिले काही दिवस मी आता कुठून बरं सुरूवात करावी अशा विचारात पडे. पण लवकरच लक्षात आलं की समोरच्यांना बहुतेक वेळा काही सरळसोट उत्तराची अपेक्षा असते, त्यांची व्यामिश्र कारणमिमांसा ऐकण्याची तयारी नसते.

मग मी उत्तरांचे दोन पर्याय तयार केलेपहिला पर्याय खालील प्रमाणे.

नव्याण्णव सालाच्या आसपास silicon valley तला dot com चा उच्छाद शीगेला पोचला होता. IPO, stock options, venture funding, NASDAQ चं वातावरण होतं. मित्रांच्या गप्पातून, वर्तमानपत्रातून, टी. वी. वर सतत कोण कुठे millionaire झाला याचीच चर्चा. एके दिवशी माझ्या ८ वर्षे वयाच्या मुलाने मला विचारलं– “बाबा, तुमची net worth काय?” मी मुळापासून हललो! कधी तरी वाचलेल गीतेतलं वचन आठवलं   

स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहः  

तत्क्षणी ठरवलं, परत जायचं!

आता पर्याय क्रमांक दोन.

प्रश्न विचारणाऱ्याच्या हातात काही मजेदार पेय असेल तर मी उत्तरादाखल कवी हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी सुनवतो  

कितनी जल्दी रंग बदलती है अपना चंचल हाला  
कितनी जल्दी घिसने लगता हाथोंमे आकर प्याला  
कितनी जल्दी साकीका आकर्षण घटने लगता है  
प्रात नही थी वैसी जैसी रात लगी थी मधुशाला  

अर्थात या दोन्ही पर्यायात गंमती बरोबर  तथ्यांशही आहेच!   

पुढे जाण्यापुर्वी थोडं वाचकांच्या अपेक्षेचं व्यवस्थापन करणं गरजेच आहे. (हे expectation management चं भाषांतर. असो.) हे एका अर्थाने प्रवास वर्णन आहे. भारतअमेरिकाभारत या स्थलांतराचा धागा पकडून केलेलं हे निरीक्षण आहे. हे कुठल्याही प्रकारचे generalization समजू नये.   

त्र्याण्णव साली अमेरिकेला आलो तेंव्हा तिकडचे जग आणि इकडचे जग अशी स्पष्ट विभागणी होती. परत यायचं हे त्यावेळी निश्चित केलेल होतंआणि दोन हजार एक साली परत आलोही. पण यातली गंमत अशी होती की  तीच गोष्ट करण्यामागची कारणं मात्रजातांना अणि येतांनाअगदी वेगळी होती. बदल फक्त बाहेर झाला नव्हता.  

पुढील भाग:
परक्यांचाच देश! (भाग २)
गणवेशातून मुक्ती नाही! (भाग ३)
सोन्याची द्वारका (भाग ४)
बॉर्न अगेन सिटीझन (भाग ५) अप्रकाशित.

Advertisements

Written by Abhay Shivgounda Patil

February 15, 2013 at 9:13 am

Posted in India, Marathi, NRI

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: