Abhay Shivgounda Patil

About what matters.

गणवेषातून मुक्ती नाही! (दोन स्थलांतरांची गोष्ट – भाग ३)

leave a comment »

BapatMotel

कवी वसंत बाप्ट

“अजब देश गजब तऱ्हा व्यक्तीवरती सक्ती नाही  
सहस्रशीर्षा पुरूषा! तुझी गणवेषातून मुक्ती नाही!”
(कवी वसंत बापट, प्रवासाच्या कविता)

English version साठी इथे टिचकी मारा.

आत्तापर्यंतची गोष्ट: भाग १, परक्यांचाच देश (भाग२)

या सुरक्षित, सधन आणि सुसंस्कृत अमेरिकन आयुष्यात मनाच्या एका कोपऱ्यात, नकळत, “आहे मनोहर तरीअसे विचार यायला सुरूवात  झाली होती. हे असं वाटणं दोन पातळ्यांवरचं होतं.

एक म्हणजे चाळीशी जवळ दिसू लागल्यावर येणारेआपल्याला नक्की काय करायचय, कमवायचय हे नियमित प्रश्नआता आपलं यापुढचं आयुष्य जिथून आलो तिथेच घालवावं असं वाटायला लागलं. भारतातल्या वातावरणात, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपण जास्त रमू असं जाणवायला लागलं. भारतातल्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी आपल्या कुवती प्रमाणे, जमेल त्या पध्दतीने जोडून घ्यावं असं वाटायला लागलं.

दुसरं म्हणजे, त्याच वेळी आयुष्यात एक अस्वस्थ करणारा तोच तोच पणा येत होता. अमेरिकेत बऱ्याच वेळा असं वाटायचं की आपण बेटा बेटांतून रहातो आहोत, जगतो आहोत. म्हणजे घर, ऑफिस, मित्रांची घरं, वीक एंड्सच्या सफरी, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाची सॉकर मॅच अशी चाकोरीबध्द बेटं आणि ती तरंगतायत विस्तीर्ण आणि अनोळखी अमेरिकन अंतराळातम्हणजे तुम्ही एका सेट वरून दुसऱ्या सेटवर जाताय, असं. तसं पहायला गेलं तर हा देशच मुळात एक सुरी. ऐंशीच्या दशकात कवी वसंत बापटांनी लिहीलेलं आजही पटतं

होटेल मोटेल खेटर मोटर देशभर करा प्रवास  
एकच रूप एकच रंग  एकच रुची एकच वास  
अजब देश गजब तऱ्हा व्यक्तीवरती सक्ती नाही  
सहस्रशीर्षा पुरूषा! तुझी गणवेषातून मुक्ती नाही!

आणि हे फक्त मलाच वाटंत होतं असं नाही. माझ्या पत्नॊच्याही मनात असेच विचार घोळत होते. एकेदिवशी अगदी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे आमचा परत जाण्याचा प्रवास सुरू झाला. निर्णयाच्या क्षणापासून प्रत्यक्ष पुण्यात पोहोचेपर्यंत दीड वर्षाचा कालावधी गेला. अमेरिकेत येण्यापुर्वी आम्ही मुंबईत होतो. पण परत गेल्यावर पुण्यात रहायचं ठरवलं. मग परतायच्या काही महिने आधी शाळांना भेटी आणि प्रवेश, शाळेजवळ भाड्याने जागा. नोकरीचं पुण्याला गेल्यावर बघू असं ठरवलं होतं पण योगायोगाने जायच्या काही आठवडे आधीच नोकरीचं पण नक्की झालं.  

पुढे:
सोन्याची द्वारका.  (भाग ४)
बॉर्न अगेन सिटीझन (भाग ५) अप्रकाशित.

Advertisements

Written by Abhay Shivgounda Patil

February 22, 2013 at 10:37 pm

Posted in India, Marathi, NRI

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: