Abhay Shivgounda Patil

About what matters.

सोन्याच्या द्वारकेला जाउच नये! (दोन स्थलांतरांची गोष्ट – भाग ४)

with 3 comments

new_york_skyline-wide  सोन्याच्या द्वारकेत शहाण्याने जाउच नये
आपले घर अंगण अधिकच कंगाल दिसते
पुन्हा पाय ठेवी पर्यंत सर्व व्हावे सोनियाचे
प्रत्येक सुदाम्याचे एवढे भागधेय नसते
(प्रवासाच्या कविता, १९८२, वसंत बापट)  

(आत्तापर्यंतची गोष्ट: भाग १, परक्यांचाच देश (भाग२), गणवेषातून मुक्ती नाही (भाग ३)English version साठी इथे टिचकी मारा.

या ओळीतला कंगालपणाचा अर्थ मी भौतिक दारिद्र्य असा घेत नाहीतर आपल्याकडची सार्वजनिक आयुष्यातील दिवाळखोरी असा घेतो.

भारतात असतांना रोज भयानक दारिद्र्य बघण्याची, त्याबद्दल वाचण्याची, एवढी सवय झालेली होती की मन त्याबाबतीत desensitize झलं होतं. एका परदेशी प्रवाश्याचं केंव्हातरी वाचलेलं मनोगत मला नेहमी आठवतं. तो सांगतो–  ” लोक मला विचारतात की भारतातलं भयानक दारिद्र्य, अस्वच्छता, मुलभूत गरजांची होणारी हेळसांड आणि भ्रष्टाचार पाहून तुम्हाला धक्का बसला का? हो मला धक्का बसला हे खरंपण तो या गोष्टींचा नाही. सुखवस्तू भारतीय माणसांची या गोष्टींवर जी प्रतिक्रिया असते ती पाहून मात्र मी नक्कीच थक्क झालो.”   मला हे निरीक्षण् खूपच नेमकं वाटतं. भारतात परतलो तेंव्हा माझी गत या परदेशी माणसासारखीच झाली. अमेरिकेत राहून जशी शरीराची प्रतिकारशक्ती (immunity) कमी झाली होती, तसंच मनाचही झालं होतं.  

नेहमीच्याचगोष्टी पाहून आपल्याला जरा जास्तच त्रास होतोय हे जाणवलं. एका प्रकारचा हा loss of innocence चाच प्रकार होता.

लक्षात आलं की बरीच मंडळी अशा परिस्थितीत तिरीमीरीत पुन्हा परत जायचं ठरवतात. माझं मात्र तसं झालं नाही. केवळ दृष्टी  आड सृष्टी झाली तरी परिस्थितीत काही बदल घडत नाही. आपल्याकडून झालाच तर सकारात्मकचमग तो कितीही छोट्या व्याप्तीचा का असेनाबदल घडेल, आणि ते इथे राहूनच जास्त जमेल हे पटलं होतं.

या ठिकाणी हे ही नमूद करयला हवं की व्यक्तीशः मला आणि माझ्या कुटुंबियाना काही त्रास होत नव्हता

पुढे (शेवट्चा भाग)
बॉर्न अगेन सिटीझन! (अप्रकाशित)

Advertisements

Written by Abhay Shivgounda Patil

March 1, 2013 at 6:21 am

Posted in India, Marathi, NRI, Poetry, Poverty

3 Responses

Subscribe to comments with RSS.

 1. अभय,

  खूपच छान विवेचन आहे. आम्ही तसे अगदीतच लगेच परत आलो, पण तरीही बऱ्याच गोष्टींशी relate करू शकतो. पण हे लेख आता ४ वर्षे जुने झाले. एका update साठी योग्य वेळ? आणि ही चार वर्षं बरीच उलाढालींची आहेत!

  -अमित

  asuph

  May 9, 2017 at 2:22 pm

  • अमित – चार नाही पंधरा वर्षं झाली अाहेत! अाणि मी चार महिन्यापुर्वी पुन्हा एकदा अमेरिकेत दाखल झालो अाहे. बघूया – अजुन एक वर्षभरांनी लिहीन पुढचा भाग.

   • Ah. this confused me: Written by Abhay Shivgounda Patil – March 1, 2013. Looking forward to the next installment.

    asuph

    June 2, 2017 at 10:51 am


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: