Abhay Shivgounda Patil

About what matters.

कविता १०१

with 3 comments

IrshaadStageगणित अाणि कविता या दोन गोष्टीत कमालीचं साम्य अाहे. दोन्ही अल्पाक्षरी – फाफटपसारा अजिबात नाही. दोन्हीत अाशय अाणि अर्थ ठासून भरलेला. अाणि, “अाम्हाला त्यातलं काही कळत नाही” असं म्हणून त्यापासून दूर पळणारे लोकही दोन्हीकडे. गेल्या महिन्यात संदीप खरे अाणि वैभव जोशी या कवीद्वयांचा “इर्शाद” हा काव्यवाचनाचा कार्यक्रम कॅलिफोर्नियाच्या सिलीकॉन व्हॅलीत झाला तेंव्हा प्रेक्षकांत “कविता कळत नाही” संप्रदायातले जे कोणी होते त्या सगळ्यांचं  irreversible ह्रदयपरिवर्तन झालं असणार यात शंका नाही! मित्र संजय अापटेची फेसबुकवरची प्रतिक्रिया प्रातिनिधिक होती.

शाळेत मराठी पद्य म्हणजे आम्ही जेमतेम पास. कुठल्याही कवितेने मला मुळापासुन हलवल वगैरे नाही की कधी माझ्या मनात कसलेही तरंग वगैरे निर्माण केले नाहीत, त्यामुळे कवितांच्या कार्यक्रमापासून मी बहुधा लांबच राहतो पण काल कॅलिफोर्निया आर्टस् ससोसिएशन (Calaa) च्या १५ वर्ष निमित्त झालेल्या संदीप खरे आणि वैभव जोशींच्या ‘इर्शाद’ कार्यक्रमात जरा डोकावलो आणि मेलो. चक्क कविता ऐकत बसलो, नुसत्याच ऐकल्या नाहीत तर प्रचंड आवडल्या.

म्हणजे Science मधे गोडी निर्माण व्हावी म्हणून Popular Science लिहीणाऱ्या शास्त्रज्ञांसारखंच या कवींचं काम महत्वाचं अाहे. “मंचीय कविता” असं म्हणून काहीजण काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला कमी लेखत असतीलही, पण या निमीत्ताने कवितेकडे लोक वळतील हे नक्की. अमेरिकेत विद्यापीठात विषयाची अोळख करून देणाऱ्या course ला “अमुक तमुक १०१” असे नाव देतात – तसा हा “कविता १०१”! कर्मधर्मसंयोगाने मला हा कार्यक्रम त्यांच्या शेजारी बसून ऐकता अाला. अोळख करून देतांना मी कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांच्या या ओळी उधृत केल्या.

अनुल्लेखानं वाळलं तर
किंवा
पायाखाली चुरगाळलं तर;
पण
याहून मोठा
अन्याय होईल फुलांवर
त्यांचं नाव
जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून
गाळलं तर.

कविताही फुलांसारखीच जीवनावश्यक गोष्ट अाहे हे नक्की!

बरं, इथपर्यंत अालाच अाहात तर मी वाचलेल्या (माझ्या नाहीत – घाबरू नका) या कविताही जाता जाता ऐका.
एक दिवस मी परमेश्वराला – कवी केशव मेश्राम

अमेरिकन शेतकरी भाऊ! – कवी वसंत बापट

तू हवीस यात न पाप – कवी पु. शि. रेगे

शिरच्छेद – कवी वैभव छाया

 

Written by Abhay Shivgounda Patil

May 13, 2017 at 8:42 pm

3 Responses

Subscribe to comments with RSS.

  1. अभय, अतिशय वाचनीय आणि छान लघुलेख ! अमेरिकेतील कार्यक्रम मस्तच झाला असणार.

    टीप: लेखाच्या खाली दिलेल्या लिंक्स पैकी पहिल्या दोन एकाच ठिकाणी जातात. काय गडबड असेल तर पाहून घे (माझ्या भाषेची वैदर्भीय धाटणी काही मला चुकवता येत नाही).

    khirwadkar

    May 14, 2017 at 9:21 am


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: